Publish Date: Sat, 20 Jan 2018 (11:09 IST)
Updated Date: Sat, 20 Jan 2018 (11:13 IST)
राज्यात पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाणीपट्टी दरात 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई निर्देशांक 63 टक्क्यांनी वाढल्याने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2010 नंतर राज्यातील पाण्याच्या दरात 7 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वापरासाठीच्या पाणीदरात 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मीटर न बसवता पाणी घेणाऱ्या नगरपालिका, महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे. जलसंपदा विभागाशी करार न करता पाणी उचलणाऱ्यांना दोन पट दर द्यावा लागेल. तर पालिकांनी पिण्यासाठी पाणी घेऊन ते उद्योगांना पुरवल्यास तीन पट दर आकारला जाईल, असं प्राधिकरणाने म्हटल आहे.