राज्यात काही दिवस काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरुच असल्यामुळे पूरबाधित गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा अन्यथा पडू नका अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे.वशिष्ठी नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे प्रशासन काळजीत आहे. .
चिपळूणमधील सुरु असेलल्या पावसामुळे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सर्व गावांना आणि नगरपालिका, पूरबाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. २४ तास सतत पाऊस पडल्यानंतर चिपळूणमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून नगरपालिकेचे कर्मचारी अनेक भागांच्या गस्तीसाठी नेमण्यात आले आहेत.मुसळधार पावसामुळे शहरात धोकादायक घटना घडू नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे.
दापोलीत ही पावसाचा जोर सुरु आहे.पावसाच्या संततधार सुरु आहे.हवामान खात्याकडून कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.सध्या इथे पावसाची संततधार असल्यामुळे पाणी भरती झाल्यामुळे भीतीचे सावट आहे.
वाशिष्ठी नदीपात्रातले पाणी तुडुंब भरले असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.प्रशासनाने या भागात धोक्याच्या इशारा देऊन नागरिकांना सतर्क राहण्यात सांगितले आहे.
चिपळूण मध्ये बाजारपेठेत पाणी भरले आहे.दापोली तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.घरात देखील पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्यानं या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.सध्या गणेशोत्सवामुळे कोकणात भाविक येण्यास सुरुवात झाली आहे.अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.