Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जमाफीसाठी मोबाईल अॅप लाँच करणार

कर्जमाफीसाठी  मोबाईल अॅप लाँच करणार
, गुरूवार, 27 जुलै 2017 (17:12 IST)

कर्जमाफी ही खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी. त्यामध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जो 15 पानी अर्ज भरायचा आहे, तो सोपा अर्ज आहे. कोणीही हा अर्ज सहज भरु शकतं. तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येईल. शिवाय कर्जमाफीसाठी आम्ही मोबाईल अॅप लाँच करणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यूपीए सरकारने 2008-09 मध्ये केलेली कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपेक्षा मुंबईत सर्वाधिक 208 कोटींची झाली होती.  त्यामुळे अशा त्रुटी टाळण्यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.

“कर्जमाफी महत्वाची आहे मात्र हा कायमस्वरुपी उपाय नाही. आपण त्यावरच थांबलो तर शेतकरी कधीच कर्जमुक्त होणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी कर्जमाफीबाबतचे निकष आणि संपूर्ण प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माहिती दिली. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वंदे मातरम्’वरून वादाला सुरुवात