Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला- नारायण राणें

narayan rane
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (09:16 IST)
प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यासोबतच सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला, असा देखील आरोप केला जात आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून यासंदर्भात राज्य सरकारला लक्ष्य केल्यानंतर आता त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंगावर पांढरं जाणं म्हणजे काय? व्हाईट डिस्चार्जकडे दुर्लक्ष करू नका, कारण...