Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, चांगला माणूस घडवायचाय- मोहन भागवत

आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, चांगला माणूस घडवायचाय- मोहन भागवत
, रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (10:14 IST)
आम्हाला कोणाचाही धर्म बदलायचा नाहीये तर माणसाला समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवायची आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. छत्तीसगढ येथे आयोजित घोष शिबिरात ते बोलत होते.
"आपण भारतभूमीत जन्मलो आहोत. आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला द्यायची आहे", असं त्यांनी सांगितलं.
"भारताला विश्वगुरु बनवायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. देशाची व्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न असेल तर ते योग्य नाही.
पूजा-उपासना यामध्ये विविधता असूनही आपलेपणाची वागणूक ही सर्वांना एकजुटीने मिळून मिसळून राहण्याची शिकवण देते. कोणालाही परकेपणाची वागणूक देत नाही. हीच आपल्या धर्माची शिकवण आहे. या माध्यमातून लोकांना समृद्ध जीवन जगण्याची शिकवण देता येऊ शकते. हरवलेलं व्यावहारिक संतुलन परत मिळवता येऊ शकतं, "असं त्यांनी सांगितलं

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाब मलिकांच्या कन्येचं ट्वीट, वानखेडेंच्या विवाह दाखल्याची माहिती