Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

..त्यानंतर आपण सर्वजण सोबतच राहू बेटा..” नाशिकच्या जवानाचा तो फोन ठरला अखेरचा..

..त्यानंतर आपण सर्वजण सोबतच राहू बेटा..” नाशिकच्या जवानाचा तो फोन ठरला अखेरचा..
, गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (15:46 IST)
मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील व सध्या अंबड गावानजीक असलेल्या कंफर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे हे सैन्यदलामध्ये आपल्या देशाची सेवा करीत होते. सैन्यदलाच्या कार्यालयातून त्यांच्या पत्नीला फोन आला की त्यांच्या पतीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे.या घटनेने संपूर्ण सोनवणे कुटुंबीय हादरले. सोनवणे कुटुंबीयांचे दुर्दैव असे की गणेश सोनवणे यांचे दोन्ही बंधूचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.  ते देशसेवा करीत असतांना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांचा अंत्यविधी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे होणार आहे.
 
”मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू आणि हो माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबती असलेल्या सर्व मित्रांनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे. आपण खूपच मज्जा करू बेटा..! असे आपल्या मुलीला सांगत जम्मू कश्मीर या ठिकाणी सैन्यदलात देशसेवेत कार्यरत असलेल्या गणेश सोनवणे यांनी आपला फोन ठेवला. अन् नंतर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांचा फोन आला…आणि काळजाचा ठोका चुकला…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथराव खडसेंची आता ‘या’ प्रकरणात चौकशी करण्याची मागणी