महाराष्ट्रात थंडी कमी झाल्यानंतर आता वातावरण गरम झाले आहे. तसेच सकाळपासूनच उन्हाचा पारा वाढतो आहे. मुंबई मध्ये मागील आठवड्यापर्यंत जी थंडी होती ती आता कमी झाली आहे. गुरुवारी मुंबईत अधिकतर तापमान 37.2 डिग्री सेल्सियस पर्यंत गेले. हे तापमान सरासरी पेक्षा पाच डिग्री जास्त होते. तेच तापमान 25 डिग्रीच्या जवळपास राहिले. जे सरासरी 6 डिग्री वरती आहे. मुंबई, ठाणे, पालघर सोबत राज्यच्या 10 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 24 तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तापमान असेच राहिल. कडक उन, घाम आणि उष्णता मुळे ठाणे-मुंबईचे लोक त्रस्त झाले आहेत. फेब्रुवारी मध्येच शेवटच्या दिवशी तापमान 40 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहचले. गुरुवारी ठाणे जिल्ह्यात जास्त तापमान होते अशी नोंद झाली. लोकांना सावधान राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
मुंबईत मागील 3 दिवसांपासून उष्णता वाढली आहे. गुरवारी कोलाबा मध्ये 35.2 डिग्री सेल्सियस आणि सांताक्रूज मध्ये 37.2 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरसरीपेक्षा क्रमश: 4.2 आणि 4.8 डिग्री जास्त होते. या दरम्यान आद्रता पण सरासरी 70 ते 80 मध्ये राहिली. शहरामध्ये काही ठिकाणी आकाशात आंशिक रुपात काळे ढग निघाले होते. तसेच येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात दुपारी किंवा संध्याकाळी आंशिक रुपाने काळे ढग जमा होतील. या दरम्यान थोडा पाऊस पडू शकतो. तर तापमान 37 आणि किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस मध्ये राहण्याची संभावना आहे.
तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागांमध्ये येत्या 72 तासांत गारा, वारा-वादळ, विजांच्या कडकडाटीसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर मध्ये हलकसा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर पुणे, नंदुरबार, सतारा, सांगली, सोलापुर, जालना, बीड आणि उस्मानाबाद मध्ये हलकासा-मध्यम पाऊस पडण्याची संभावना वर्तवली गेली आहे. तसेच या दरम्यान काही ठिकाणी थंडगार हवा सुटू शकते.
Edited By- Dhanashri Naik