राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसासह गारपीट झाल्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या तीन दिवस असेच वातावरण राहणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे हंगामातील पिके काढणीला आले असता पीक खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.
राज्यात मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा थैमान सुरु होता. अवकाळी पावसासह गारपीट सुरु असून पिकांचे नुकसान झाले आहे. परभणीत वीज पडून
चौघांचा मृत्यू झाला .तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात अजिंठा लेणी ,सोयगाव येथे वादळी पावसासह गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्यानं राज्यात 20 मार्च पर्यंत स्थिती धोकादायक सांगितली आहे.
राज्यात मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच राज्यात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्र भागात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.