Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपुरात फडणवीस यांचे जंगी स्वागत

devendra fadnavis
, मंगळवार, 5 जुलै 2022 (15:27 IST)
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच ते त्यांच्या मूळगावी  नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजप नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.ढोल ताशांच्या  गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात हजर होते. फटाक्यांची आतिषबाजीही यावेळी करण्यात आली.
 
महाविकास आघाडी सरकार उलथवून लावून राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आले आहे. बहुमत चाचणीतही हे सरकार यशस्वी ठरले. सत्तांतराच्या नाट्यात देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात कुठेही दिसले नसले तरीही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे आश्चर्यकारकरित्या त्यांना उपमुख्यमंत्री पदावरही बसावं लागलं. त्यानंतर आज ते नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी नागपुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच, यावेळी जनतेच्या या प्रेमामुळेच आपण यशस्वी आहोत, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरु, भुसे, कांदे यांना पर्याय शोधण्याचे आदेश