नशीब बलवत्तर म्हणून तरुण वाचला आहे. मंत्रालयात आत्महत्या करायला गेला आणि जाळीत अडकला त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले आहे. मंत्रालयावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना आगोदर घडल्या आहेत. आज पुन्हा एका तरुणाने मंत्रालयावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आत्महत्येच्या घटनाामुळे गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे तरुण पूर्णतः सुरक्षित वाचला असून तो त्या जाळीवर बसून होता. या तरुणांचे नाव लक्ष्मण चव्हाण असून तो प्रजासत्ताक भारत या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाला पोलिसांनी लगेच खाली उतरवून ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. आत्महत्या करणारा तरुण प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता आहे. तिसऱ्या मजल्यावरुन त्याने उडी मारली होती. .पोलीस व अन्य एका माणसाच्या प्रयत्नाने त्याला खाली काढण्यात आले आहे. लक्ष्मण चव्हाण पुण्याच्या कोथरुड येथील रहिवासी आहे. शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, कुपोषण , बालमृत्यू जोपर्यंत थांबत नाहीत, तो पार्यंत मुख्यमंत्र्यांनी व्हीव्हीआयपी सुविधा घेऊ नये, सरकारी निवास स्थानात राहू नये, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करावे अशी मागणी त्याने केलीय. या आगोर ६ सप्टेंबर २०१८ रोजी एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पतीविरोधात तक्रार दाखल करुन देखील पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या महिलेने मंत्रालयासमोर जाऊन आत्महत्या प्रयत्न केला होता.