Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृषी विद्यापीठांचा काय फायदा? गडकरींचा सवाल

nitin
, शनिवार, 16 जुलै 2022 (09:13 IST)
अमेरिकेत एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतं आणि आपल्या देशात 4 क्विंटलच्या वर नाही. मग कृषी विद्यापीठांचा काय फायदा? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
 
नागपुरात शुक्रवारी डॉ. सी.डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी झाले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते.
 
गडकरी म्हणाले की, "धानाची शेती परवडत नाही तरी शेतकरी ती सोडायला तयार नाहीत, बदल करायला तयार नाहीत. कापसाला भाव बांगलादेशमुळे मिळतोय. यावर्षी आपला कापूस बांगलादेशात वर्ध्यातील पोर्टवरुन पाठवायचा आहे.
 
"अनेकांनी शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं. पण शेतीवर कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. 50 टक्क्यांवर सिंचन झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मी राज्यात सिंचन मंत्री असताना अनेक सिंचन प्रकल्पाचं काम केलं, त्यासाठी पैसे दिले. नदी जोड प्रकल्पावर तुम्ही काम करा, मी सर्वतोपरी मदत करेल".

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकही आमदार पडणार नाही, पराभूत झाला तर मी राजकारण सोडून देईन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे