काही दिवसांवर आता दिवाळी येऊन ठेपली. पण तरीही पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अद्यापही परतीचा पाऊस महाराष्ट्राच दाखल झाला नसून, त्याची वाट गुजरातमध्येच अडली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात ऐन ऑक्टोबरमध्ये कधी कडाक्याचं ऊन तर, कधी मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. पिकं कापणीला आलेली असतानाच होणारा पाऊस बळीराजापुढचं मोठं आव्हान ठरत आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसांमध्येही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी या पावसाच्या हजेरीमुळे ओलीचिंब असणार आहे. 20 ते 24 ऑक्टोबरदरम्यान मगाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. किंबहुना याआधी म्हणजेच 15 ते 17 ऑक्टोबरमध्ये कोकण, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Edited By-Ratandeep Ranshoor