Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय म्हणता, अधिवेशनासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

rajya vidhi mandal
, शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (21:14 IST)
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे त्या खर्चात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वतयारीबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार यांचे निवासस्थान आणि कार्यालय तसेच अधिकाऱ्यांचे निवासस्थान आणि कार्यालयासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येते.
 
शहरातील आमदार निवासाव्यतिरिक्त नाग भवन, हैदराबाद हाऊस, रवी भवन, 160 गाळा, राजनगरचे 64 फ्लॅट, सीताबर्डी येथील बचत भवन, रविनगर आदी जागा ताब्यात घेऊन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींचे नूतनीकरण करून शौचालये आणि इतर दुरुस्तीसह साहित्यही दिले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 95 कोटींचा खर्चाचा आराखडा तयार केला आहे. अधिवेशनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून संबंधित खात्याला तात्पुरत्या स्वरूपात सुमारे 45 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 2019 पासून शहरात अधिवेशन झालेले नाही. अशा स्थितीत सर्वच इमारतींमध्ये डागडुजीची कामं आणि इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरात सर्वत्र गवत आणि झाडे वाढली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे खर्च वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 साली नागपूरला झालेल्या अधिवेशनासाठी 65 कोटी इतका खर्च करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा 30 कोटींचा जास्त खर्च अपेक्षित आहे. खराब साहित्य नव्याने खरेदी करावे लागणार असून जीएसटी आणि सीएसआरच्या दरात वाढ झाल्याने हा खर्च वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटीची तरतूद : मुख्यमंत्री