Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात नेमकं काय बोलणार?

राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात नेमकं काय बोलणार?
, शनिवार, 2 एप्रिल 2022 (18:55 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज संध्याकाळी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे होणार आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे काय भाषण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
 
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका, इंधनाचे वाढते दर आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप या आणि अशा मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलणार, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 16 वा वर्धापन दिन 9 मार्च रोजी पुण्यात पार पडला. यावेळी भाषण करताना राज ठाकरेंनी हे नुसतं ट्रेलर असून पूर्ण पिक्चर गुढीपाडव्याला बघायला मिळेल, असं म्हटलं होतं.
 
त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते शिवाजी पार्कावर जमा झाले आहेत.
 
राज तिलक की करो तैय्यारी, आ रहे है भगवा धारी, अशा आशयाचे फलक त्यांच्या हातात आहेत.
आजच्या गुढीपाडव्या निमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होतोय. या सभेसाठी राज्यभरातल्या मनसैनिकांनी यावं असं राज ठाकरेंनी पुण्यामध्ये म्हटलं होतं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2022: जोस बटलरने 300 व्या T20 सामन्यात शतक झळकावले,ऑरेंज कॅप पटकावली