Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

विरोधी पक्षनेत्या चे काम काय असतं? सरकारला चांगलं म्हणण्याचं काम असतं का?

eknath shinde
, शुक्रवार, 30 जून 2023 (21:43 IST)
BJP-Shiv Sena alliance भाजपा-शिवसेना युती सरकारची वर्षपूर्ती होत असण्याच्या  निमित्ताने ठाण्याच्या आनंद मठात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी स्वत: एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळ माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलं.
 
यावेळी एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं नाव घेऊन अजित पवारांना लक्ष्य केलं. “विरोधी पक्षनेत्या चे काम काय असतं? सरकारला चांगलं म्हणण्याचं काम असतं का? विरोधी पक्षनेत्याचं काम त्यांना करू द्या. सरकार म्हणून आम्हाला आमचं काम करू द्या. विरोधी पक्षनेते मनातून बोलत नाहीयेत. त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावं लागतंय म्हणून ते बोलतायत. कारण सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी काय केलं याची आठवण त्यांना आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीसांना क्लीन बोल्ड वगैरे केल्याचं शरद पवार म्हणाले. पण त्यांनी क्लीन बोल्ड अजित पवारांनाच केलंय. हे अजित पवारांना माहितीये. अजित पवार ते विसरणार नाहीत. तेव्हा एकाच वेळी अनेकांशी बोलणी सुरू होती, हेच शरद पवारांनी मान्य केलंय”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे