राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज म्हाडाकडून राज्यात बांधण्यात येणाऱ्या घरांची माहिती देत सांगितले की कोकणात म्हाडा ८,२०५ घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तसंच ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, विरार, बोळींज, मीरा रोड येथे घरे असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे म्हाडाची घरे असणार आहेत. गोर गरीब लोकांसाठी घर उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
म्हाडाच्या अर्जाची किंमत ५६० रुपये असून लॉटरी १४ ऑक्टोबरला रोजी काढली जाईल. २३ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होणार असून म्हाडा फॉर्म विक्री सुरू करणार आहे.
घराची मागणी लक्षात घेता नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर इथेही ७ ते १० हजार घरे पुढील दोन वर्षात बांधली जातील असे आव्हाड यांनी सांगितले. पुढील आठ दिवसात मुंबईतील घरांच्या लॉटरीची घोषणा केली जाणार आहे.