मुंबईसह कोकण किनारपट्टीवर येत्या 5 दिवसात कोसळणार पावसाच्या सरी येतील. तसेच पैठण येथील जायकवाडी धरणात जवळपास 35 हजार क्युसेक पाणी येत होते या मुळे धरणात 92 टक्के पाणीसाठी वाढलाअसून शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रकल्पाच्या नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाथसागरात पाण्याची आवक वाढल असून जिल्हाअधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते विधीवत नाथसागराचे पाणी व दरवाजाचे पुजन करून 18 दरवाजातून 9432 क्यूसेकने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले. या वेळी गोदाकाठच्या नागरीकांना तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उप अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खरडाकर यांची उपस्थिती होती.