Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक महाराष्ट्रातच आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर ? नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांचा संतप्त सवाल

नाशिक महाराष्ट्रातच आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर ? नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांचा संतप्त सवाल
, मंगळवार, 19 मार्च 2019 (19:29 IST)
नाशिकला इतरांच्या तुलनेत वेगळे काही नको जे इतरांना जे देणार ते आम्हाला द्या मात्र आहे ते काढून घेऊ नका अशी टीका करत छगन भुजबळ यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला. आज नाशिकच्या एसएसके हॉटेल येथे नरेडको संस्थेकडून आयोजित शहर विकास नियंत्रण नियमावलीबाबत सवांद सत्रात ते बोलत होते.
 
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शैलेश कुटे, शराध्यध्यक्ष रंजन ठाकरे,नरेडको संस्थेचे सुनील गवांदे, राजन दर्यांनी, जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, जयंत भातंबरेकर, दिपक बागड, राजेंद्र बागड, गोपाल अटल, भगवान काळे, आर्की म्हाळस, दिनेश भामरे, कुलदीप चावरे,भूषण महाजन, विपुल नेरकर, सुजय गुप्ता आदी उपस्थित होते.
 
छगन भुजबळ म्हणाले की, सरकारकडून शहर विकास नियंत्रण नियमावलीत शाब्दिक छल केल्याचे दिसते त्यामुळे यातून वेगवेगळे अर्थ निघतात. अजय चा सुजय झाला हे मी समजू शकतो मात्र शहर विकास नियंत्रण नियमावलीत इतक्या मोठ्या चुका कशा होऊ शकतात अशी टीका त्यांनी केली. राज्यातील इतर शहरामध्ये शहर विकास नियंत्रण नियमावलीसाठी वेगळे नियम आणि केवळ नाशिकसाठी वेगळा टेबल देऊन नाशिकवर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दत्तक घेतले की, सापत्न वागणूक दिली जाते हेच समजत नाही. शहर नियंत्रण विकास नियमावली बाबत इतर शहरांना जे नियम लावले तेच नियम आम्हाला लावले पाहिजे. त्यासाठी येथील व्यावसायिक स्पर्धा करण्यास तयार आहे. नाशिकच्या पुढे नागपूर जात असेल तर आम्हाला आनंद आहे मात्र नाशिकला डावलले जावू नये, नाशिकरांना वेगळी ट्रीटमेंट देणे हा नाशिककरांवर अन्याय आहे. युती सरकारचा हा सायकॉलॉजीकल स्ट्राईक असल्याचे त्यांनी टीका छगन भुजबळ यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीएसएमटी पूल अपघातप्रकरणी मुंबईच्या आयुक्तांवर गुन्हा नोंदवा - नवाब मलिक यांची मागणी