पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे.
पावसाळी अधिवेशनात विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात मांडले जातील. या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याकरता सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बाजूने मतदान व्हावे
याकरता सुनिल प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. यानुसार, या व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होऊ शकते. दरम्यान, शिंदे गटाकडून भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याने ठाकरे गटाने बनवलेला व्हिप अधिकृत ठरेल का हे पाहावे लागणार आहे.