Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईस्क्रीममध्ये कोणाचे बोट सापडले, डीएनए चाचणीत उघड

आईस्क्रीममध्ये कोणाचे बोट सापडले, डीएनए चाचणीत उघड
, शुक्रवार, 28 जून 2024 (09:10 IST)
मुंबईतील मालाड परिसरात एका आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा काही भाग सापडल्याप्रकरणी तपासादरम्यान एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. बोटाचा भाग पुण्यातील इंदापूर येथील एका आईस्क्रीम कारखान्यातील कर्मचाऱ्याचा असल्याचे 'डीएनए' चाचणीत उघड झाले आहे.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आईस्क्रीम फॅक्टरीच्या एका कर्मचाऱ्याच्या डीएनए एकच असल्याचे म्हटले आहे. 
 
इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला," असे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये ते आढळून आले, त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली.
मुंबईतील एका डॉक्टरला आइस्क्रीम कोनमध्ये मानवी बोट सापडले. डॉक्टरांनी याचा व्हिडिओ बनवून नाराजी व्यक्त केली होती. यानंतर, आईस्क्रीम पॅक केले त्याच दिवशी कारखान्यातील एक कर्मचारी जखमी झाल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट आणि कर्मचाऱ्याचे डीएनए जुळले. डीएनए चाचणीत आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा भाग कर्मचाऱ्याचा असल्याचे स्पष्ट झाले.
 
फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑफ इंडिया (FSSAI) ने Yummo ला आइस्क्रीम पुरवणाऱ्या उत्पादकाचा परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा नियामकाने म्हटले आहे की, "FSSAI च्या पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने आइस्क्रीम उत्पादकाच्या परिसराची तपासणी केली आहे आणि त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कंपनीने तपासात सहकार्य करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे.पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर कंपनीविरुद्ध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे आणि मानवी जीवन धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली विमानतळाच्या छताचा भाग कोसळला,सहा जखमी