येत्या डिसेंबरपर्यंत मुंबई उपनगरीय स्थानकांतील आणखी ७ रेल्वे स्थानकामध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यात पश्चिम रेल्वेतील खार, अंधेरी, बोरीवली तर मध्य रेल्वेतील ठाणे, कल्याण, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या २०१८ पर्यंत देशभरातील एकूण ४०० स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०१६पर्यंत १०० स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २०१६ च्या जानेवारीत सुरू झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आणखी १० स्थानकांवर सुविधा देण्यात आली. वायफाय सुरू झाल्यावर प्रत्येक आठवड्याला चार ते पाच लाख प्रवासी त्याचा लाभ घेतात.