Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Unlock लॉकडाऊन निर्बंध शिथिल होणार? ठाकरेंनी दिलं उत्तर

Maharashtra Unlock लॉकडाऊन निर्बंध शिथिल होणार? ठाकरेंनी दिलं उत्तर
, मंगळवार, 25 मे 2021 (10:43 IST)
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढणार का? अशी चर्चा असताना दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील केला जाण्याचे शक्यतेचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहेत. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार एक जूनपासून लॉकडाउनचे काही निर्बंध हटवण्याची सुरुवात करू शकते. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच सरकार निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करता येईल तरी निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
 
निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नसून तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, असेही सांगण्यता येत आहे. 
 
या प्रकारे मिळू शकते सूट
अनलॉकच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. 
पहिला टप्पा: दुकानांना ठराविक वेळेत दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी.
दुसरा टप्पा: पर्यायी दिवसांवर दुकाने उघडण्यास परवानगी.
तिसरा टप्पा: सरकार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि दारूविक्रीची दुकानं उघडण्यास परवानगी देऊ शकतं. हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
चौथा टप्पा: लोकल सेवा आणि धार्मिक स्थळं, मंदिरं आदी उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते. 
 
कॅबिनेट तसंच टास्क फोर्ससोबत होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होईल नंतरच निर्णय घेतला जाईल-
कोविड पॉझिटिव्हिटी रेट एका अंकावर घसरत आहे
आयसीयू ऑक्सिजनची उपलब्धता ६० टक्क्यांहून अधिक असणे
राज्यभरातील एकूण मृत्यूदर
 
महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सोमवारी राज्यात 22 हजार 122 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 69 दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकणातील तौक्ते नुकसानग्रस्तांसाठी भाजपकडून ‘फिफ्थ पिलर’ उपक्रम