Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवघ्या 10 दिवसांत हिवाळी अधिवेशन गुंडाळणार? हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर

nagpur adhiveshan
, बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (13:05 IST)
नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यंदाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसांत गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते मात्र या वर्षी अधिवेशन 20 डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदा ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. हिवाळी अधिवेशानाचे हे तात्पुरचे वेळापत्रक असून, २० डिसेंबरपर्यंतच्या कामकाजाची नोंद यात करण्यात आलीये.
 
२ दिवसांची कात्री
दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते. मात्र यावेळी तात्पुरत्या अधिवेशनाच्या वेळापत्रकात शुक्रवारीच अधिवेशन गुंडाळल्याचं दिसतंय. त्यामुळे या कामकाजाला पुढील दोन दिवसांची कात्री लावली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?
सध्या नाशिक -पुणे अंमली पदार्थांचे प्रकरण मोठ्या चर्चेत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील दुष्काळ, कायदा- सुव्यवस्था, नागपुरात झासेली अतिवृष्टी, पूरग्रस्त भागांती नागरिकांचे प्रश्न, अशा विविध प्रश्नांवर चर्चा होऊ शकते.
 
नागपुरात झालेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. पुराच्या तडाख्यामुळे अद्यापही अनेकांना त्याच्या झळा सोसाव्या लागतायत. त्यामुळे या अधिवेशनात येथील व्यक्तींना विशेष पॅकेज जाहीर केले जाईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं .
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune: पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण