Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

भाजप- मनसे युती होणार ?

devendra fadnavis raj
, मंगळवार, 19 एप्रिल 2022 (12:11 IST)
सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावर केलेले वक्तव्या मुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करायला सुरु केल  आहे. त्यांच्या या मुद्द्याला धरून भाजपचं पाठबळ मिळत आहे. त्यामुळे आता भाजप आणि मनसेची युती होणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेनं हिंदुत्वसोडले आहे असा आरोप वेळोवेळी  भाजपने केला आहे. आता मुंबई आणि पुणे निवडणुका लवकरच होणार आहे. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्यामुळे या ठिकाणी ते सोबत लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
भाजप ने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत शिवसेनाला इशारा दिला आहे. आता शिवसेना नव्या पक्षाच्या शोधात असण्याची शक्यता आहे. भाजपचे मनसेला भोंग्याच्या मुद्द्यावरून पाठबळ दिले आहे त्यामुळे आता भाजप-मनसेची युती होणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगोलियात वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते रवी दहिया आणि बजरंग पुनिया सहभागी होणार