आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली.
या बैठकीत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्रा घ्यावा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्याचे समजते.
मनसे आणि भाजप युती होणार का? हा प्रश्न कायम असला तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोबत घेण्याची शक्यता आहे.
तसंच या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि मनसे एकत्रित लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे अशीही माहिती मिळते आहे. मनसेसोबत युती करू नये या मुद्यावर भाजपच्या नेत्यांचं एकमत झाल्याचं समजते.
त्यामुळे स्वबळावर सत्ता आणण्यासाठी काम करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.