Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक शहरात पाणीकपात होणार का.. महापौरांनी दिले स्पष्टीकरण…

नाशिक शहरात पाणीकपात होणार का.. महापौरांनी दिले स्पष्टीकरण…
, शनिवार, 8 मे 2021 (12:02 IST)
नाशिक शहरात तूर्तास पाणी कपात केली जाणार नसून नागरिकांनी मात्र पाणी बचतीचे धोरण अवलंबावे असे आवाहन महापौर सतीश (नाना) कुलकर्णी यांनी केले आहे. नाशिक शहरातील गंगापूर धरणाचा शहरासाठी असणारा शिल्लक पाण्याचा साठा लक्षात घेता व भविष्यातील पाण्याची निकड या गोष्टींचा विचार करून पाणी कपात करण्याच्या निर्णयासाठी महापौर सतिष(नाना) कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा पदाधिकारी व गटनेते तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची बैठक महापौर निवासस्थान रामायण येथे पार पडली.
 
शहरातील दररोज असणारी पाण्याची आवश्यकता व मनपाचा साठी उपलब्ध असणारे पाण्याचा साठा या सर्व गोष्टींचा विचार करून तूर्तास पाणी कपात करू नये यासह नाशिकरोड येथे पुरवठा होत असलेल्या पाण्याबाबत तसेच शहरातील विविध भागातील पाणीपुरवठ्या बाबत या बैठकीत चर्चा झाली.
 
या बैठकीत अंतिमतः महापौर कुलकर्णी यांनी सांगितले की नाशिक शहराची व्याप्ती त्या अनुषंगाने असलेली लोकसंख्या व शहरासाठी असलेले पाण्याचे आरक्षण  विचार करून पाण्याची निकड लक्षात घेता नागरिकांनी पाणी बचतीचे धोरण अवलंबावे जेणे करून भविष्यात पाणी कपात करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सध्याची शहरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता तुर्तास पाणी कपात केली जाणार नसल्याचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात भूमाफियांविरोधात ही पहिलीच कारवाई बांधकाम व्यावसायिक कोल्हेसह २० जणांना मोक्का