मुंबईची एक महिला आपल्या पतीच्या सवयीमुळे इतकी परेशान झाली की तिने सुप्रीम कोर्टाचे दार वाजवले आहे. या महिलेच्या पतीला पॉर्न बघण्याची एवढी सवय जडली आहे की त्याच्या दांपत्य जीवनावर याचा प्रभाव पडत आहे. 55 वर्षाच्या पतीच्या या सवयीमुळे परेशान पत्नीने पॉर्न साईट्सवर बंदी घालण्याची याचिका दिली आहे.
महिलेने याचिकेत म्हटले आहे की तिचा शिकलेला पती पॉनेपुढे इतका असहाय्य आहे तर तरुणांवर याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. महिलेने म्हटले की माझे पती अधिकश्या वेळ पॉर्न बघण्यात घालवतात जे इंटरनेटवर अगदी सहज उपलब्ध आहे. यामुळे माझे पती मानसिक रूपाने दूषित झाले आहे आणि आमच्या दांपत्य जीवनावर याचा प्रभाव पडत आहे.
महिला म्हणाली की 30 वर्षांपर्यंत आमची वैवाहिक जीवन सुरळीत चालत होतं पण जेव्हापासून पतीने पॉर्न बघणे सुरू केले आहे त्यांच्या खाजगी जीवनावर याचा परिणाम झाला आहे. पतीच्या या सवयीमुळे मुलेदेखील परेशान आहेत.
याचिका दाखल करणारी महिला सामाजिक कार्यकर्ता आहे. तिने म्हटले की कामच्या दरम्यान तिला अनेक असे लोकं भेटले ज्यांच्या खाजगी जीवनावर पॉर्नचा विपरित प्रभाव दिसून येत आहे.