मुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही महिला चेंबूरची असून तिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले SRPF चे जवान, हवालदार डी. के. माने, पोलीस शिपाई के. डी. राऊत यांनी वेळीच महिलेच्या हातून रॉकेलची बाटली हातून काढून घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते ज्याची परतफेड न करता आल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.