Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनुदानाच्या मागणीसाठी महिलांचे भांडी घासून आंदोलन

अनुदानाच्या मागणीसाठी महिलांचे भांडी घासून आंदोलन
, मंगळवार, 29 जून 2021 (08:24 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने 30 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना दीड हजार रुपयेची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे.
 
हे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भांडी घासून आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे मोठी आर्थिक पोकळी निर्माण झाली आहे. अनेकांच्या रोजगारावर गदा अली आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. यातच शासनाकडून काही आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यामध्येच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने 30 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना दीड हजार रुपयेची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे.
 
शासन निर्णय जाहीर होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही आजतागायत ही मदत घरेलू कामगारांना मिळालेली नाही. मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मात्र घरेलू कामगार महिला अशिक्षित व आर्थिक दुर्बल घटक असल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज भरणे अशक्य आहे.सर्व माहिती सदर कार्यालयाकडे जमा असताना कार्यालयानेच घरेलू कामगारांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज आहे. यामुळे घरेलू कामगारांचे वेळ व पैसा वाचणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लसीचे दोन डोस घेतलेल्यानंतरही २६ जणांना कोरोना