Publish Date: Mon, 02 Feb 2026 (12:11 IST)
Updated Date: Mon, 02 Feb 2026 (12:12 IST)
मुख्यमंत्री माझी 'लाडकी बहीण' योजनेच्या पुढच्या हप्त्यांसाठी काही महिलांना पुन्हा KYC (e-KYC) करणे अनिवार्य असू शकते. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकीय बदलांमुळे किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांचे पैसे काही कारणास्तव थांबले आहे किंवा ज्यांचे बँक खाते सक्रिय नाही, त्यांना हे काम करावे लागेल.
KYC का करावी लागणार?
बँक खाते अपडेट नसणे: जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसेल, तर पैसे जमा होण्यात अडथळा येतो.
माहितीतील तफावत: अर्जातील नाव आणि आधार कार्डावरील नाव यात फरक असल्यास पुन्हा पडताळणी केली जाते.
अपूर्ण माहिती: काही अर्जदारांची तांत्रिक माहिती सिस्टममध्ये अपूर्ण असल्यामुळे 'री-व्हेरिफिकेशन' आवश्यक आहे.
हे काम लवकरात लवकर पूर्ण केल्यास रखडलेले सर्व हप्तेम्हणजेच मागील महिने आणि सध्याचा महिना एकत्रित मिळण्याची शक्यता आहे.
Edited By- Dhanashri Naik