Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रथमच महाराष्ट्रा येथे वर्ल्ड पीस अर्थात जागतिक शांतता परिषदेचे आयोजन

प्रथमच महाराष्ट्रा येथे  वर्ल्ड पीस अर्थात जागतिक शांतता परिषदेचे आयोजन
नाशिक , सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (10:10 IST)
सोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेली गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये 19 वी जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवस चालणार्‍या या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत उद्या दि. 24 रोजी होणार असल्याची माहिती गोखले एज्युकेश सोसायटीचे सचिव डॉ. मो.स. गोसवी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

परिषदेचे उदघाटन आज सकाळी 10 वाजता होईल. याच दिवशी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिला जाणारा पहिला ‘सर डॉ एम एस गोसावी एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ अणू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर याना राज्यपालांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर भुषवणार आहेत. तर विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीश महाजन, खा.चिंतामणजी वनगा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आय.ए.इ.डब्ल्यू.पी. ही संयुक्त राष्ट्रांची अशासकीय संघटना 69 सालापासून शिक्षणाद्वारे आंतरराष्ट्रीय सामंजस्य , शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 100 हून अधिक देशात संघटनेच्या शाखा आहेत. ही परिषद १९ वी असून   भरवण्याचा बहुमान यंदा प्रथमच महाराष्ट्राला मिळाला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिळाला आहे.
भारतात ही परिषद तिसर्‍यांदा होत असून आहे. शांतता या विषयाबद्दल आस्था असणारे 150 प्रतिनिधी आणि 25 तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. नवा विचार, मानसिकता असणारे विचारवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, उद्योजक, पालक, नेते शिक्षणातून निर्माण करणे हे आय ए इ डब्ल्यू पी चे ध्येय असून नेमके हेच उद्दिष्ट बाळगून गोखले एज्युकेशन संस्था साडेनऊ दशके काम करत आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस परिषदेच्या निमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर राव नाशिक दौर्‍यावर येत असून, त्यांच्या सुरक्षेसह एकूणच व्यवस्थेबाबत चोख तयारी करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने  संबंधित विभागांना दिल्या आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेट्रोल पम्प यांचा अधोरेखित करणारा संप