Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

सुप्रिया सुळेंचं सरकारला चॅलेंज

Supriya Sule
देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी सरकारला आवाहन दिलं आहे. माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा, असं खुलं आवाहन सुप्रिया सुळेंनी सोलापुरात दिलं. 
 
मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ट्रॅकवर आणण्यासाठी सीतारमण यांच्या अनेक घोषणा
सुप्रिया सुळे 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.
 
मी काही केलंच नाही तर कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करायला मजा येते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस भावनेचं राजकारण करत आहेत - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप..