बहुचर्चित सातव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झाले. यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठान व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यास खा. सुप्रिया सुळे , कोषाध्यक्ष हेमंत टकले , चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर, महोत्सव संचालक जब्बार पटेल , सरचिटणीस शरद काळे, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अनेक नवोदित चित्रपट निर्माते, कलाकार, दिग्दर्शकांना या चित्रपटांमधून प्रेरणा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे दर्जेदार व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध झाले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे काही नवे शिकण्याची संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.