Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पीएचाही नंबर व्हॉट्सअ‍ॅपने बंद केला तुमचा सुद्धा होईल

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पीएचाही नंबर व्हॉट्सअ‍ॅपने बंद केला तुमचा सुद्धा होईल
, शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:25 IST)
मॅसेंजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने बल्कमध्ये मॅसेज पाठविणाऱ्यांना जोरदार धक्का दिला आहे. भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने जोरदार कारवाई केली असून, Whats App अशी मशीन लर्निंग सिस्टिम तयार केली आहे, खोटे मॅसेज किंवा मोठ्या प्रमाणावर मॅसेज पुढे पाठविणाऱ्यांचा नंबरच बंद करण्यात आला आहे. असे जवळपास दर महिन्याला 20 लाख अकाऊंट Whats App बंद करत असून, यात जोरदार फटका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पीएचाही नंबर व्हॉट्सअ‍ॅपने बंद केला आहे. मशीन लर्निंग सिस्टिम द्वारे एकाचवेळी अनेकांना मॅसेज करणाऱ्या व्यक्तींना शोधले असून, ही व्यक्ती काय माहिती पाठवत आहे, याबाबत पडताळणी केली जाते असून, प्रकाराला बल्क मॅसेजिंग म्ह़टले जाते. या प्रणालीच्या वापराने व्हॉट्सअ‍ॅप कंटेंट शेअरिंगवरही लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता तुम्ही जर असे करणार आहात तर सावध रहा कारण तुम्ही जर चूक केली तर तुम्ही कोणीही असाल आणि कोणत्याही पदावर असणार असाल तरी तुमचे व्हॉट्सअ‍ॅपने बंद होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हाट्सअ‍ॅप सोबत अनेक सोशल मिडिया अ‍ॅप २०१९ निवडणुकीत करणार सेवा बंद