Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PUBGच्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन

PUBGच्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन
जळगाव , सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (19:29 IST)
12 वीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गळफास घेत आपले जीवन संपविल्याची दुर्दावी घटना घडली आहे. तिला मोबाईलवर पब्जी गेम (PUBG) खेळण्याचा नाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. पब्जीच्या (PUBG) नादात तरुणीने आत्महत्या केल्याने जामनेर शहरात (Jamner City) खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.
 
नम्रता पद्माकर खोडके (वय-20, रा. जामनेर, मुळ रा. भराडी, ता. जामनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.पब्जी (PUBG) खेळाच्या नादात एका स्टेपवर येऊन आत्महत्या केली. नम्रताचे वडिल खासगी स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर (Assistant Doctor) म्हणून काम पाहतात. तरुण मुलीने आत्महत्या केल्याने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
खोडके यांचे वाकी रोडवर घराचे काम सुरु आहे. बांधकामावर पाणी मारण्यासाठी आई गेली होती. आई गेल्यानंतर नम्रताने घराच्या स्लॅबला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. नम्रता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीसीए (BCA) या वर्गात शिकत होती. आई घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरसेवक हेमंत वाणी, अतीष झाल्टे, दत्तात्रय सोनवणे, जालमसिंग राजपूत, सुभाष शिंदे, लोकेश डांगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला जामनेर येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
 
नम्रताने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नये असे तिने सुसाईड नोटमध्ये इंग्रजीत लिहिले आहे.
जप्त केलेला मोबाईल फेस लॉक असल्याने पोलिसांनी तिच्या चेहऱ्यासमोर नेत तो उघढला.
मोबाईलमध्ये पब्जी गेम संबंधीत स्क्रिनशॉट मिळाल्याचे सुत्रांकडून समजतेय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र बंद: राज्यभरात संमिश्र प्रतिसाद, कुठे काय घडलं?