नाशिक : पोलिस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल भानुदास चौघुले (२२, रा. एक्स्लो पॉइंट, अंबड) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने मागील आठवड्यातच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. ऑनलाइन निकाल पाहिल्यावर तो नापास झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याने शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याने विषारी औषध सेवन केले. रात्री त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.