Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैला शुध्दीकरण प्रकल्पात उडी मारून तरुणाची आत्महत्या

मैला शुध्दीकरण प्रकल्पात उडी मारून तरुणाची आत्महत्या
, मंगळवार, 4 मे 2021 (08:09 IST)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील टाकीमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली. या आत्महत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रवी जानराव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार रवी जानराव यांनी मैला शुद्धीकरण केंद्राच्या टाकीवर चढून थेट उडी मारून आत्महत्या केली. घरगुती वादातून रवी यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
या घटनेनंतर स्थानिकांनी या मैला शुद्धीकरण केंद्राकडे धाव घेत या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रवी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पिंपरी शहरातील भाटनगर लिंकरोडवर असलेल्या मैला शुद्धीकरण केंद्राची सुरक्षा महापालिकाकडून केली जात आहे.
 
कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला मैला शुद्धीकरण केंद्रात प्रवेश नसतो. मात्र मयत रवी वॉचमन म्हणून तिथे रात्रीच्या वेळी काम करायचा आणि तो काही कामासाठी आला असेल म्हणून त्याला प्रवेश दिल्या गेला आणि त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

“पंढरपूरमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार का?”