Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे बीड मध्ये तरुणाची आत्महत्या

suicide
, शनिवार, 15 जून 2024 (09:23 IST)
लोकसभा निवडणुकी मध्ये बीड मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचाराष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांच्या कडून पराभव झाला. बीड येथे  एका 30 वर्षीय तरुणाने पंकजा मुंडे यांच्या पराभवाने दुखी होऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. बीड जिल्ह्यात दिघोळ आंबा गावात एका 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. पांडुरंग सोनावणे असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. 
 
पंकजा मुंडे जिंकल्यावर जिल्ह्यात विकास होईल अशी अपेक्षा पांडुरंग सोनावणे यांनी केली होती. मात्र पंकजा निवडणुकीत पराभूत झाल्या. मयत पांडुरंग सोनावणे यांच्या भावाने सांगितले, पंकजा ताईंच्या पराभवानंतर पांडुरंग दुखी झाला तो विचित्र वागायचं त्याला रुग्णालयात दाखल केले. तो सतत तब्बेतीची तक्रार करत होता.त्याला काय झालं आहे डॉक्टरांना समजू शकले नाही.
 
 त्याने 9 जून रोजी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. त्याने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात लिहिले आहे. माझ्या पंकजा मुंडे ताई साहेब लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या मला त्यांचा पराभव सहन होत नसून मी आत्महत्या करत आहे. 
पांडुरंग यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. 
 
पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे दुःखी होऊन दोन अजून लोकांनी आत्महत्या केली. असे एकूण तीन जणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहे. पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे.  

Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs CAN: कॅनडा विरुद्ध टीम इंडियात आज होणार सामना, प्लेइंग 11 जाणून घ्या