देशात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडतात.आता मुली आणि महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाही जरी स्वतःचे घर असले तरी. पण आताच्या काळात महिला, मुलींसह पाळीव प्राणी देखील सुरक्षित नाही. एका तरुणाने भटक्या प्राण्यांसोबत गैरवर्तन करण्याचे वृत्त समोर आले आहे.
सदर घटना अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या घराजवळ काही भटके प्राणी फिरत असताना कचरा विकणाऱ्या एका तरुणाने प्राणांसोबत गैरवर्तन केले. ही घटनाला सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे.
आरोपीच्या हालचाली संशयास्पद असल्याने तक्रारदाराचे तरुणावर पूर्ण लक्ष होते. तक्रादाराने प्राण्यांसोबत गैरवर्तन करताना पाहिल्यावर तो आरोपीला पकडण्यासाठी धावला. पण आरोपीने तिथून पळ काढला.
नंतर ही बाब स्वयंसेवीसंस्थेच्या लोकांना कळवण्यात आली. त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही केमेरे चेक करण्यात आले. या मध्ये आरोपी गेल्या तीन दिवसांपासून त्याभागात फिरत होता आणि त्याने प्राण्यांसोबत चुकीचे कृत्य केल्याचे उघडकीस आले.
आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपीच्या विरुद्ध रात्री उशिरा, प्राणी संरक्षण आणि प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास अजनी पोलीस करत आहे.