सिंधुदुर्गनगरी -- तळगाव गावडेवाडी येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजी मध्ये झालेल्या बाबू बैलाच्या मृत्यूची गंभीर दखल घेण्यात आली असून गावच्या पोलीस पाटलासह ,पोलीस कर्मचारी ,झुंज आयोजन करणारा व्हाट्सग्रुप व या घटनेला जे जे जबाबादार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी दिली
झुंजी लावून निष्पाप बैलाचा मृत्यू होणे ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे अत्यंत वाईट घटना आहे ही घटना थाबविता आलेली नाही त्याबद्दल जनतेची आपण दिलगिरी व्यक्त करतो मात्र यापुढे बैल झुंजच कुठल्याही प्राण्यांची झुंज होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे स्पष्ट केले तसेच मृत्यू झालेल्या बाबू बैलाचे शवविच्छेदनही करण्यात येणार आहे अशी माहिती नितीन बगाटे यांनी दिली