Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीला ८ लाखांची लाच घेताना पकडले

Zilla Parishad Secondary Education Officer caught taking bribe of Rs 8 lakh Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
, बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (08:15 IST)
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली पंकज विर उर्फ झनकर (४४) यांनी तक्रारदाराकडे सुमारे नऊ लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती आठ लाखांची रक्कम शासकिय चालकाला पाठवून ती स्विकारताना झनकर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात अडकल्या.पथकाने संशयित चालकासह एका शिक्षकालाही याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
 
शासनाने मंजुर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती.यानंतर तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. यानुसार त्यांच्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला.
 
तडजोड व्यवहारात ठरल्याप्रमाणे आठ लाखांची रक्कम स्विकारण्यासाठी झनकर यांचा शासकिय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता त्याने तक्रारदारकाडून रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजल्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ५ हजार ६०९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली