Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इसिस संशयित शाहिद खानला पोलीस कोठडी

इसिस संशयित शाहिद खानला पोलीस कोठडी
औरंगाबाद- मराठवाडय़ात ‘इसिस’ची पाळेमुळे खोलवर रुजताना दिसत आहेत. कारण नासेरबिन चाऊसच्या अटकेनंतर परभणीतून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आणखी एका तरुणाला अटक केली आहे.
 
शाहिद खान असे तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक किलो स्ङ्खोटके आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. एटीएसने रविवारी शाहिदला कोर्टात हजर केले. त्याला 29 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
नासेरबिन आणि शाहिद मित्र आहेत, त्यांनी मिळून योजना बॉम्ब बनविण्याची योजना आखली होती. डिटोनेटर आणि आरडीएक्स हे एकत्र करुन ठेवले होते. शाहिदच्या आजीच्या घरात एका पिशवीत ही स्फोटके सापडली आहेत. एटीएसच्या अधिकार्‍यांनी या कारवाईस दुजोराही दिला आहे.
 
आठ दिवसांपासून दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते. काहीजणांवर या पथकाला संशय होता. याच संशयातून शनिवारी रात्री शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातून शाहीद खानला या पथकाने ताब्यात घेतले आहे.मराठवाडय़ातील अनेक मुस्लीम तरुण बेपत्ता असून ते ‘इसिस’च्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. या पाश्र्वभूमीवर एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी सध्या मराठवाडय़ातच आहेत. येथील तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त केले जात असल्याच्या वृत्ताला कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे. ‘आयएस’च्या आकर्षणातून परदेशी गेलेल्या 100 मुलांचे समुपदेशन करून त्यांना परत आणण्यात यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा