Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी बस नदीत वाहून जाताना बचावली!

एसटी बस नदीत वाहून जाताना बचावली!
नंदूरबार , गुरूवार, 11 ऑगस्ट 2016 (10:29 IST)
नवापूर तालुक्यात आज सकाळी एसटी बस नदीत वाहून जाताना थोडक्यात बचावली. स्थानिकांच्या मदतीने एसटीमधील 17 जणांना वाचवण्यात यश आलं.
 
गुजरातच्या सीमेलगत असलेल्या अहावा डांग जंगल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला आहे.
 
याच पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली होती. एमएच 20 बी एल 2610 ही एसटी बस रंगावली नदीत वाहून जात होती. मात्र यावेळी प्रवाशांनी प्रचंड आरडाओरडा केला. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत जेसीबीच्या साहाय्याने बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. दरम्यान, यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.       

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हातारा दिसू लागला चार वर्षाचा शिकदर