Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, १ ठार

कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, १ ठार
कल्याण , सोमवार, 25 जुलै 2016 (16:46 IST)
कल्याण पश्चिममधील आधारवाडी येथील गायकवाड निवास इमारतीत सुमारास एलपीजी गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला ठार झालीये तर ११ जण जखमी झालेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 
 
या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती कि त्या घराचे तर प्रचंड नुकसान झालेच शिवाय आजूबाजूच्या इतर तीन घरांचंसुद्धा नुकसान झालं असून घराच्या भिंती पूर्ण पडल्या आंहेत..
 
या स्फोटात ११ जण जखमी झाले असून ७० वर्षीय ताराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना सायन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 
 
शबाना शेख यांच्या घरात गॅस लिकेज झाला होता. सकाळी लाईटचे बटन लावताच गॅसचा स्फोट झाला आणि हा सर्व प्रकार घडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांनी केले पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन