Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसेंची न्यायालयीन चौकशी

खडसेंची न्यायालयीन चौकशी
मुंबई , मंगळवार, 21 जून 2016 (10:53 IST)
भोसरी एमआयडीसीच्या जमीन प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली माहिती दिली.

सरकारचं काम प्रामाणिकपणे सुरु आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरील सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. जनतेला कन्व्हिन्स करु शकत नाहीत, म्हणून कन्फ्युज करण्याचा विरोधकांचा डाव आहे.

असं म्हणत फडणवीस यांनी खडसेंची पाठराखण केली होती. या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी खडसेंची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतचं पुण्याच्या कार्यकारणीत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंची जाहीर पाठराखण केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जयदेव ठाकरे यांची उलटतपासणी