Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोल्डमॅन दत्तात्रय फुगेची दगडाने ठेचून हत्या

गोल्डमॅन दत्तात्रय फुगेची दगडाने ठेचून हत्या
चिंचवड , शुक्रवार, 15 जुलै 2016 (14:11 IST)
दिघीमध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना गोल्डमॅन दत्तात्रय फुगेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

दत्तात्रय फुगेच्या सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा होती. इतकंच नाही तर फुगेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये नोंद झाली होती. सर्वांत महागडा सोन्याचा शर्ट खरेदी करण्याचा विक्रम दत्ता फुगेच्या नावावर होता. चिटफंड व्यवसायाच्या घोटाळ्यातून फुगेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

अतुल मोहिते, बाळा वाळके, शैलेष वाळके आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहशतवादी हल्ल्याचं समर्थन करत नाही : झाकीर नाईक