सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेस राज्य सरकार जबाबदार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर 302 कलमांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटिशकालीन जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणार्या दोन एस.टी. बसेससह इतर 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, 22 जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे. दरम्यान बचाव पथकाला दोन मृतदेह हाती लागले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी बुधवारी विधानसभेत मे महिन्यात या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. पूल ब्रिटिशकालीन होता, पण त्याची पाहणी झाली होती. पूल प्रवासासाठी सुरक्षित होता मात्र हा अहवाल त्यांनी दिला होता.