Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डान्स बारमध्ये पैसे उधळण्याची परवानगी नाही

डान्स बारमध्ये पैसे उधळण्याची परवानगी नाही
, मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (16:58 IST)
मुंबई- मुंबईत डान्स बारमध्ये डान्सदरम्यान बार गर्लवर पैसे उधळण्याची परवानगी नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.  
 
नवीन एक्टमध्ये डान्स बार मध्ये पैसे उधळण्यावर राज्य सरकारने बंदी घातली असून सुप्रीम कोर्टाने याचे समर्थन केले आहे. स्त्रियांवर पैसे फेकणे हे सभ्यता व संस्कृतीत न शोभणारे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  दरम्यान, नव्या कायद्यावर राज्य सरकारने दोन आठवड्यांत उत्तर द्यावे, अशी नोटीसही सुप्रीम कोर्टाने बजावली आहे.
 
डान्स बारवर 2013 मध्ये बंदी घालण्यात आली होती. परंतु, एप्रिल 2016 मध्ये काही अटींवर डान्स बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  डान्स बार मालकांनी अटींविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. 
 
याचिकेत डान्सबार मालकांनी कायद्यातील अनेक अटींवर बोट ठेवलं आहे. ही याचिका मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केली असली तरी कोर्टाने ही विनंती फेटाळली. या कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुप्रीम कोर्टातच सुनावणी होईल, असे कोर्टाने स्पष्ट केले. पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगेश्वरचा ब्रॉन्ज मेडल सिल्वरमध्ये बदलेल