Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

@दहावी निकाल : राज्यातील निकाल 89.5

@दहावी निकाल : राज्यातील निकाल 89.5
पुणे , सोमवार, 6 जून 2016 (12:53 IST)
पुणे93.30, मुली ९१.४१, मुले ८७.९८
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च  २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहिर करण्यात आला. राज्याची नियमित विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी ८९.५६ टक्के आहे. बारावी प्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.५६ टक्के तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८१.५४ टक्के लागला. बेस्ट ऑफ फाइव नुसार निकाल जाहिर करण्यात आला.
 
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या ६ लाख ७१ हजार ८५३ असून मुलांची संख्या ७ लाख ६२ हजार २९० एवढी आहे.
 
राज्य मंडळातर्फे सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल प्रसिध्द केला जाईल. विद्यार्थ्यांना निकालाची मुळ प्रत येत्या १५ जून  रोजी दुपारी 3 वाजता संबंधित शाळामधे वितरित केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर्षी निकालात १.९० % कमी लागला आहे.
निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा : 
http://mahresult.nic.in

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हायब्रंट एचआर संघटनेतर्फे जागतीक पर्यावरण दिन साजरा