दारू पार्टी भरली कमी दारू सनबर्न वर गुन्हा दाखल
, शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (10:26 IST)
एखदयाला जेवण कमी दिले किवा अन्य चागल्या कारणासाठी कोणी हॉटेल चालकला कोर्टात खेचते, मात्र दारू साठी कोर्टात. हो हे घडले आहे पेशव्यांच्या पुण्यात सनबर्न विरोधात. सनबर्नमध्ये दारुचे पेग देताना ठरलेल्या मापापेक्षा कमी दिल्यानं आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरीकडे फेस्टिव्हलमध्ये पाण्याची बाटलीही 50 ते 100 रुपयांना विकल्याची तक्रार वैधमापन विभागाकडे दाखल झाली आहे. तक्रारीनंतर वैधमापन विभागानं सनबर्नमध्ये जाऊन पडताळणी केली असता तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. त्यानंतर सनबर्नवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे सनबर्न आता पुढच्या अडचणी वाढल्या असून नेमके काय प्रकार पुढे होणार आहे हे पाहणे उस्तुकतेचे होईल.
पुढील लेख